दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास ठोकल्या बेड्या.
स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी.

बीड (प्रतिनिधी) जिल्ह्यात मागील काही महिन्यात चोरी,घरफोडी तसेच चैनच्या प्रमाणात वाढ झाली असून यावर बीड पोलिसांनी चोरावर कारवाइचा फास आवळला आहे.
दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल व सराईत गुन्हेगारास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलीस ठाणे पिंपळनेर हद्दीतील मौजे कुकुडगाव, ता. जि. बीड येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
दि. 12 जानेवारी 2026 रोजी कुकुडगाव येथील रहिवासी इंदरराव रामभाऊ नवले हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून बाजारासाठी बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम चोरून नेली होती. या प्रकरणी पोलीस ठाणे पिंपळनेर येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
दि. 06 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा भगवान ईश्वर भोसले व त्याचा भाऊ कु-या ईश्वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर, ह.मु. नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) यांनी मिळून केला आहे. यापैकी भगवान ईश्वर भोसले हा नागझरी येथे आल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागझरी येथे छापा टाकला असता आरोपी भगवान ईश्वर भोसले हा झाडाखाली बसलेला आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने पोस्टे पिंपळनेर गु.र.नं. 08/2026 तसेच पोस्टे आष्टी गु.र.नं. 16/2026 अन्वये कलम 305, 331(3) भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली.
आरोपीस पुढील तपासासाठी पोलीस ठाणे पिंपळनेर यांच्या ताब्यात देण्यात आले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे पिंपळनेर करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक व मा. अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि खटावकर, तसेच पोह/अशोक दुबाले, पोह/सोमनाथ गायकवाड,पोह राहुल शिंदे, पोह/बाळू सानप, पोह/विकास राठोड, पोह/अंकुश वरपे, पोअ/अर्जुन यादव, पोअ/2210 अशफाक सय्यद, पोअ/मनोज परजणे व चापोअ/सिद्धेश्वर मांजरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.










