ब्रेकिंग न्यूज

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद -अंबाजोगाई – उल्लेखनीय समाज कार्यासाठीचे पुरस्कार देण्यात आले.

समाजातील उल्लेखनीय कार्याचा गौरव.

 

 

*समाज व्यवस्थेमध्ये घडणाऱ्या नकारात्मक किंवा सकारात्मक घटनांबद्दल पञकारांनी आवाज उठवला पाहिजे-पञकार संजय मालाणी*

*अखिल भारतीय मराठी पञकार परिषदेच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात अधिष्ठाता डाॅ.धपाटे,राजेसाहेब देशमुख, मा.आ.संगिता ठोंबरे,पो.नि.शरद जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती*

अंबाजोगाई-समाज व्यवस्थेमध्ये घडणाऱ्या नकारात्मक किंवा सकारात्मक घटनांबद्दल पञकारांनी आवाज उठवला पाहिजे असे मत पञकार संजय मालाणी यांनी अखिल भारतीय मराठी पञकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीयाच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात पुरस्काराला उत्तर देताना व्यक्त केले.

काल पञकार कक्ष.न.प, येथे पञकारिता,सामाजिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी बीड जिल्ह्यातून सर्वोत्कृष्ट प्रिंट मिडीयाचा पुरस्कार दै.प्रजापञ चे ज्येष्ठ पञकार संजय मालाणी यांना तर डीजीटल मिडीयाचा पुरस्कार साम टी.व्हीचे पञकार योगेश काशिद यांना देण्यात आले.यावेळी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. शंकर धपाटे,माजी आमदार सौ.संगिताताई ठोंबरे,राजेसाहेब देशमुख, पो.नि.शरद जोगदंड, डाॅ.राजेश इंगोले,ॲड अजित लोमटे आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते.

पुढे बोलताना पञकार संजय मालाणी यांनी म्हटले की,पञकारांनी छापलेली बातमी प्रत्येकवेळी नकारात्मक नसते.त्या बातमीची सत्यता पडताळून समाज व्यवस्थेने चांगले कार्य केले पाहिजे.प्रशासकीय व राजकीय क्षेत्रातील सर्वच घडामोडींवर लिखाण केले गेले पाहिजे.पञकारांनी निर्भीड पणे लिखाण करून समाजाचे दर्पण म्हणून कार्य करीत राहावे,असे म्हटले. तर अधिष्ठाता डाॅ. शंकर धपाटे यांनी बोलताना म्हटले की अंबाजोगाई चे पञकार जे सत्य आहे तेच छापतात.येथील पञकार संयमी आणि सकारात्मक लिखाण करतात,असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)राजेसाहेब देशमुख यांनी यावेळी पञकारांना शुभेच्छा देत म्हटले की,जे पुरस्कार दिले आहेत.ते योग्य पञकारांना दिले आहेत.पञकार समाजाचे दर्पण समजले जातात,बीड जिल्ह्यातील पञकार खरोखरच समाज हित समोर ठेवून लिखाण करतात.अखिल भारतीय मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,डीजीटल मिडीयाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे हे बीड जिल्ह्यातीलच पञकार आहे.येथूनच महाराष्ट्र नव्हे तर देशात सुञे हाताळत आहेत, एवढी ताकद बीड जिल्ह्यातील पञकारांमध्ये आहे.पञकारिता,सामाजिक व इतर क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जो पुरस्कार देवून गौरवण्यात आले अशा सर्व मान्यवरांचे त्यांनी अभिनंदन केले.
तर माजी आमदार सौ.संगिताताई ठोंबरे यांनी बोलताना म्हटले की,अंबाजोगाई मराठी पत्रकार परिषद संघातील पञकार हे खरोखरच समाजातील त्या घटकांवर प्रकाश टाकतात जेथे खूप आवश्‍यकता असते,आजचे सत्कार मुर्ती हे त्याचेच द्योतक आहे.विविध क्षेत्रातील लोकांना एकञ करीत आज जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.त्याबद्दल त्यांनी संबंधित आयोजक पञकारांचे अभिनंदन केले.
याचवेळी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जोगदंड यांनी अखिल भारतीय मराठी पञकार परिषद प्रिंट व डिजीटल मिडीयाच्या सर्व पञकार सदस्यांच्या कार्याचे कौतुक केले.शांतप्रिय व सांस्कृतिक वारसा असलेल्या अंबाजोगाई शहरात नागरिकांबरोबरच पञकार सुध्दा खूप चांगले आहेत.विविध क्षेत्रातील लोकांचा सन्मान करणे ही अंबाजोगाईची संस्कृती आहे.अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकं एकञ येतात.आज एकमेकांचा संवाद तुटत चालला आहे,अशी खंत ही त्यांनी व्यक्त केली. येथील पञकार जागृत आहेत.बातमी सकारात्मक छापतात.असे म्हणत त्यांनी सर्व पुरस्कारार्थी व सत्कार मुर्तींना शुभेच्छा देत पुढील वर्षांत मी येथे कार्यरत राहिलो तर नविन पञकार भवनात जरूर येईल असे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी डाॅ.राजेश इंगोले यांनी मला अखिल भारतीय मराठी पञकार परिषदे च्या राज्य कार्यकारिणीत घेतल्यामुळे महाराष्ट्रात एकाच वेळी सर्वच तालुक्यात पञकारांचे आरोग्य ठणठणीत राहावे, या करिता भव्य आरोग्य शिबीर घेण्यात येणार असल्याचे जाहीर वक्तव्य केले.

सदर कार्यक्रमात पञकार संजय मालाणी,योगेश काशिद यांना विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले तर पञकार अशोक खुळे ( दै.सकाळ,माजलगाव),राजेंद्र जाधव (जल संवर्धन उत्कृष्ट कार्य),हाजी चुन्नुलाल शेख (आदर्श सरपंच,सातेफळ), शाम सरवदे (समाजसेवक, अंबाजोगाई),बालासाहेब पोटभरे (पोलिस कर्मचारी तथा निसर्ग मिञ),प्रमोद चौधरी ,उमा गोस्वामी (तहसील कार्यालय, अंबाजोगाई),अनंत वेडे(स्वच्छता पुरस्कार,अंबाजोगाई),सुनिल देशमुख (ग्रामीण पुरस्कार,,बोरीसावरगाव ),सुरेश जगताप (मा.सरपंच, धानोरा खुर्द),सुधाकर देशमुख (वृक्षमिञ,ममदापूर), एन.सी.सी विद्यार्थिनी मयूरा सतिश मोरे सह सर्वांना समान चिन्ह देवून यथोचित सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष चौरे (विभागिय संघटक),रवि उबाळे (विभागीय सचिव),अनिल वाघमारे (राज्य अध्यक्ष, डीजीटल मिडीया),विशाल साळुंके(बीड जिल्हाध्यक्ष) हे उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद बीड जिल्हाकार्याध्यक्ष गजानन मुडेगावकर ,अंबाजोगाई तालुकाध्यक्ष बालाजी खैरमोडे, डिजीटल मिडाया ता.अध्यक्ष अभिजीत लोमटे, कार्याध्यक्ष सतिश मोरे,उपाध्यक्ष संजय जोगदंड, प्रिंट मिडीया अंबाजोगाई तालुका उपाध्यक्ष सालेम पठाण, सचिव मारोती जोगदंड, कोषाध्यक्ष अभय जोशी, हल्ला कृती समिती तालुकाध्यक्ष सूर्यकांत उदारे , तालुका संघटक ताहेर पटेल, अशोक कोळी,सिद्दिकी आरेफ, स.का पाटेकर, अनिरुद्ध पांचाळ, विश्वनाथ कांबळे,बालासाहेब ढगे,गोविंद सुर्यवंशी,शेख अहमद,दत्ता खोगरे,योगेश डाके,सचिन मोरे,अमोल माने,वैभव चौसाळकर,अश्विनी लोमटे, बालाजी देशमुख,जहांगीर इनामदार,अहमद पठाण, आदींनी परिश्रम केले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन मुडेगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन अभिजीत लोमटे यांनी केले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button