अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन टिप्परवर कारवाई.
तीस लाखाचा मुद्देमाल जप्त;DYSP पूजा पवार व API अशोक मुदीराज यांची कारवाई.

बीड (प्रतिनिधी)बीड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळूच्या चोरट्या वाहतुकीवर धडक कारवाई करत दोन हायवा वाहने जप्त केली असून दोन्ही वाहनांचे चालकांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण सुमारे ५९ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिली कारवाई – सकाळी रामगडजवळ दि. 28 जानेवारी 2026 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती पुजा पवार यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस पथक पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी रामगड (ता.जि. बीड) परिसरात गुप्त माहितीच्या आधारे हॉटेल सनराईज समोर सकाळी 8.30 वा. एक वाळूने भरलेला हायवा (क्रमांक MH-12 QG-4497) अडविण्यात आला.
वाहनचालक जाकेर शहाबुद्दीन शेख (रा. नांदूर हवेली, ता.जि. बीड) याच्याकडे वाळू वाहतुकीचा कोणताही कायदेशीर परवाना किंवा रॉयल्टी पावती आढळून आली नाही. त्यामुळे अंदाजे ५ ब्रास वाळूसह हायवा, एकूण ₹30,25,000/- किंमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चालकास अटक करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई – संध्याकाळी बायपास रोडवर त्याच दिवशी संध्याकाळी दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग दरम्यान पुन्हा गुप्त माहिती मिळाल्याने टोयोटा शोरूम समोर, धुळे–सोलापूर महामार्ग बायपास रोडवर सायं. 7.45 वा. दुसरा वाळूने भरलेला हायवा (क्रमांक MH-23 AR-7774) पकडण्यात आला. वाहनचालक कृष्णा विश्वनाथ वाघीरे (रा. उंदड वडगाव, ता.जि. बीड) याच्याकडे देखील वाळू वाहतुकीचा कोणताही वैध परवाना नव्हता. त्यामुळे अंदाजे ५ ब्रास वाळूसह हायवा, एकूण ₹29,25,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणीही गुन्हा दाखल करून चालकास अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अशोक मुदिराज, पोउपनि काटकर, पो.ह. जाधव, पो.ह. जायभाये, पो.कॉ. राठोड, आगलावे, हजारे यांनी सहभाग घेतला.
अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरुद्ध पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.







