ब्रेकिंग न्यूज

अंबाजोगाई पत्रकार भवणासाठी 136 स्वे. मी.जागा उपलब्ध करून देण्यात आली.

नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांची घोषणा.

*अंबाजोगाईतील पत्रकारांच्या हक्काला न्याय; पत्रकार भवनासाठी 136 चौरस मीटर जागेचा पीटीआर सुपूर्द*

अंबाजोगाई (प्रतिनिधी):

अंबाजोगाई शहरातील पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक घडामोड समोर आली असून, पत्रकार भवनाच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. नमिता ताई अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अंबाजोगाई नगरपरिषदेच्या वतीने पत्रकार भवनासाठी 136 चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सदर जागेचा पी.टी.आर. (Property Transfer Record) अधिकृतरित्या पत्रकार अतुल जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून, याबाबतची अधिकृत घोषणा अंबाजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय श्री. नंदकिशोर जी काका मुंदडा यांनी केली.
पत्रकार हे लोकशाहीचे चौथे स्तंभ मानले जातात. मात्र, त्यांच्या कार्यासाठी आवश्यक असलेले स्वतंत्र व सुसज्ज पत्रकार भवन अनेक वर्षांपासून अपूर्ण मागणी होती. ही बाब गांभीर्याने लक्षात घेत आमदार नमिता ताई मुंदडा यांनी नगरपरिषद स्तरावर सातत्याने पाठपुरावा करत ही मागणी प्रत्यक्षात आणली.
यावेळी नगराध्यक्ष नंदकिशोर जी मुंदडा म्हणाले की,
“पत्रकार समाजाचे आरसे आहेत. त्यांच्या प्रश्नांना न्याय देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचे कर्तव्य आहे. पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देताना आम्हाला विशेष समाधान वाटते.”
या निर्णयामुळे अंबाजोगाई व परिसरातील पत्रकार बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून, लवकरच येथे सुसज्ज पत्रकार भवन उभारले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यासाठी आमदार नमिता ताई मुंदडा, नगराध्यक्ष नंदकिशोर जी मुंदडा तसेच नगरपरिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे पत्रकारांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button