ब्रेकिंग न्यूज

*नगराध्यक्ष मुंदडा यांनी संक्रांतीच्या पूर्वीच कंत्राटी कामगारांना दिली गोड भेट*

अंबाजोगाई नगरपरिषद च्या कंत्राटी कामगारांचे वेतन खात्यात जमा ..!

  1. अंबाजोगाई :-शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या मात्र मागील चार महिन्यापासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कंत्राटी स्वच्छता कामगारांना नूतन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकीनंतर पदभार स्वीकारताना दिलेले आश्वासन पूर्ण करत मुंदडा यांनी संक्रांतीच्या सणापूर्वी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापैकी एक महिन्याचा पगार त्यांच्या खात्याला जमा केला आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांची संक्रांत यामुळे गोड झाली असून शहरातनगराध्यक्षांच्या या संवेदनशील निर्णयाचे स्वागत होत आहे .नगरपरिषदेच्या या कंत्राटी कामगारांचे मानधन गेल्या अनेक महिन्यापासून रखडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. सणासुदीच्या काळात हक्काचे पैसे मिळत नसल्याने कमालीची अस्वस्थता होती ही बाब लक्षात घेउन नगराध्यक्ष यांनी पदभार घेताच याला प्राधान्य दिले. त्यांनी प्रशासनाला थकीत कर वसुलीचे मोहीम राबविण्याचे कडक निर्देश दिले होते. या मोहिमेला यश आले असून जमा झालेल्या निधीचा पाहिला विनियोग कंत्राटी कामगारांच्या वेतनासाठी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.त्यामुळेच कामगारांच्या थेट खात्यात पैसे जमा झाले.
    आजची नगरपरिषदेची आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरीही मार्च अखेर पर्यंत आर्थिक घडी पुन्हा बसवणार असा निर्धार त्यांनी केला आहे. त्याच प्रमाणे उर्वरित रक्कमही प्राधान्याने दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे . या साठी थकीत बाकीत असलेल्या नागरिकांनी त्वरित भरणा करून सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहनही यावेळी केले आहे

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button