
बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील अंकुश नगर परिसरात प्लंबिंग काम करणाऱ्या एका मजुरावर दिवसाढवळ्या गोळीबार करून व धारदार शस्त्राने तोंडावर वार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती.विशाल सूर्यवंशी विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता
दिनांक 6 जानेवारी रोजी रोजी दुपारी अंकुश नगर मध्ये हर्षद तुळशीराम शिंदे या तरुणावर बंदुकीतून गोळ्या झाडत व नंतर धारदार शस्त्राने वार करून जागीच ठार करण्यात आले होते. या घटनेचा सीसीटीव्ही व मोबाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.पोलिस अधीक्षकांनी हत्या झाल्यानंतर तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगरच्या टीम आरोपीच्या शोधासाठी रवाना केल्या होत्या.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. तब्बल पाच दिवसांच्या शोधानंतर आज दि. १० जानेवारी रोजी सायंकाळी ८.३० वाजता कळम–केज रोडवरून आरोपी विशाल सूर्यवंशी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाडी,Psi सुशांत सुतळे कर्मचार मनोज वाघ ,राहुल शिंदे,अर्जुन यादव,मनोज परंजाने ,अश्फाक सय्यद,नितीन वडमारे, सिद्धेश्वर मांजरे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे केली.मजूर शिंदे यांचा खून का केला याचा तपास पोलिस करत आहेत.
आरोपीला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून पुढील तपास सुरू आहे.







