ब्रेकिंग न्यूज

बीड मधील दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराचा CCTV व्हिडिओ व्हायरल.

गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्याने खळबळ

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील अंकुश नगर परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या निर्घृण खुनाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

प्लंबिंगचे काम करणारे हर्षद तुळशीराम शिंदे (वय ३७, रा. धानोरा रोड हाउसिंग कॉलनी, बीड) यांच्यावर भर रस्त्यात बंदुकीने गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी प्रथम हर्षद शिंदे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या, त्यानंतर त्यांचा पाठलाग करून धारधार शस्त्राने तोंडावर व शरीरावर सपासप वार करण्यात आले. या क्रूर हल्ल्यात हर्षद शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये मारेकऱ्यांचा निर्भयपणे हल्ला करतानाचा थरारक प्रसंग स्पष्ट दिसत आहे.

घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली आहेत. मात्र, घटनेला तीन दिवस उलटूनही मारेकरी अद्याप फरार असल्याने बीड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दिवसाढवळ्या शहरात गोळीबार करून खून होण्याची घटना घडूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, कायद्याचा धाक संपल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button