ब्रेकिंग न्यूज

बीड शहरात खून !

अंकुश नगर भागात दिवसाढवळ्या खून!तोंडावर तीक्ष्ण हत्यारांनी वार

बीड( प्रतिनिधी)बीड शहरातील अंकुश नगर भागात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा खून करण्यात आला असून घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून शांत असलेले बीड मध्ये पुन्हा खून झाल्याने एकच खळबळ उडाली असून हर्षद तुळशीराम शिंदे वय ३७ वर्ष राहणार धानोरा रोड हाउसिंग कॉलनी बीड या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने खून करण्याची घटना घडली. हर्षद शिंदे वर बंदुकीने दोन गोळ्या फायर करण्यात आल्या व नंतर त्याला धारधार शस्त्राने तोंडावर शरीरावर वार करण्यात आले.खून कोणी व का केला? याची अधिकृत माहिती मिळाली नसून घटनास्थळी जमाव जमा झाला असून पोलीस देखील दाखल झाले आहेत.हर्षद शिंदे हा बीड नगरपालिकेची प्लंबिंग चे काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button