ब्रेकिंग न्यूज
दगडवाडी-डोंगरपिंपळा भागात प्रत्यक्ष बिबट्याचे दर्शन.
ओंकार मिरगेने काढला बिबट्याचा फोटो !

अंबाजोगाई- प्रतिनिधी
काल दगडवाडी, डोंगरपिंपळा परिसरात डॉ धर्मपात्रेच्या शेता जवळ असलेल्या तलावाजवळ ओंकोर मिरगे हा शेतात जात असताना जवळच असलेल्या तलाव जवळ बिबट्याचे पाहावयास मिळाला आणि त्याच वेळी त्याने मोबाईल मध्ये त्याचा फोटो काढला असलंयाची घटना घडली आहे.
नुकतेच डोंगरपिंपळा येथील शेतात ७ शेळ्या वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावल्याची खबर होती. आता प्रत्यक्ष दर्शन या सर्व गोष्ठीमुळे दगडवाडी, डोंगरपिंपळा,चनई,आणि अंबाजोगाई लगत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कडे प्रशासनाने त्वरित लक्ष देउन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.




