अट्टल साखळी चोर पोलिसांच्या ताब्यात.११ लाखाचा मुद्देमाल जप्त.
स्थानीय गुन्हे शाखेची मोठी कामगिरी १० गुन्ह्यांचा उलगडा.

बीड – जिल्ह्यात वाढत्या साखळी चोरी, मोबाईल चोरी व इतर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार कार्यरत असलेल्या स्थानीय गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत एका अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे. या आरोपीकडून तब्बल १० गुन्ह्यांचा उलगडा झाला असून एकूण ₹11,32,680 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिवाजीनगर परिसरात झालेल्या चोरीच्या तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी जाळे लावून आरोपीला पकडले. चौकशीदरम्यान त्याने बीड शहर, छत्रपती संभाजीनगर, जिल्हा जळगाव आणि ओकरा अहिल्यनगर या ठिकाणी साखळी चोर्या, मोबाईल चोर्या आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी केल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल
सोन्याचे दागिने : ₹9,27,680
मोबाईल (४ नग) : किमती ₹1,55,000
मोटारसायकल : किमती ₹50,000
एकूण मुद्देमाल : ₹11,32,680 उघडकीस आलेले गुन्हे
शिवाजीनगर, तिडकी, गेवराई पोस्ट, जळगाव, छ. संभाजीनगर, सातारा, घेवरखेडा, नांदूरशिंगोटे आदी ठिकाणचे एकूण १० गुन्हे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवीन कॉवत, अपर परिसराचे सचिन पांडकर,पोलीस उपाधीक्षक पूजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे शिवाजी बंटेवाड,psi श्रीराम खटावकर,पो. अश्फाक सय्यद, पो. मनोज परजणे, पो. राहुल शिंदे, पो. विकी सुरवसे व शिवाजीनगर पोलीस ठाणे व तपास पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली.








