
बीड प्रतिनिधी बीड बीड नगरपालिका निवडणुकीत इच्छुक इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांनी आपापल्या पक्षाकडे फिल्डिंग लावून उमेदवारी देण्याबाबत आग्रह केला. राष्ट्रवादी अजित पवार गट घड्याळ कडून सिटीजनचे संपादक शेख मुजीब यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने कार्यकर्त्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठ दिवसापासून बीडमध्ये राखी वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत होते शेख मुजीब यांना उमेदवारी देण्यासाठी कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी पक्षश्रेष्ठीकडे जोर लावला होता, आज उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने घड्याळाकडून शेख मुजीब यांची उमेदवारी फायनल करण्यात आली. यामुळे कार्यकर्ते स्नेही मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.







