

बीड(प्रतिनिधी)बीड, दि. 16 नोव्हेंबर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रधारकांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत बीड शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आज दुपारी साधारण 2.15 वाजण्याच्या सुमारास अजिजपुरा, नूर मस्जिद परिसरात तलवार घेऊन फिरत असलेल्या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले. या व्यक्तीकडून तब्बल चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव शेरसिंग हिंदू सिंग टाक (वय अंदाजे 55 वर्षे), रा. वडवणी, ता. वडवणी, जि. बीड असे असून त्याच्याकडून आणखीही अवैध शस्त्रे मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सर्व ठाणे प्रमुखांना अवैध शस्त्रे जप्त करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार बीड शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सदर व्यक्तीला अटक केली.
दरम्यान, बीड शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की कोणाकडेही तलवार, दारुगोळा, गावठी पिस्तूल किंवा इतर अवैध शस्त्र असल्याची माहिती असल्यास मो. 7588807774 किंवा पीएसआय महेश जाधव – मो. 9021216256
या क्रमांकावर कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कारवाई एपीआय खेडकर, पीएसआय महेश जाधव, गणेश कुमावत, तसेच पोलिस अंमलदार गहिनीनाथ बावनकर, राम पवार, सुशेन उगले आणि इलियास शेख यांनी सहभाग होते.







