भारतीय जनता मजदूर संघाच्या प्रदेश सचिव पदी निवड.
प्रदेश सचिव धनंजय कुलकर्णी तर मराठवाडा सचिव चंद्रकांत पाटील .

भारतीय जनता मजदूर संघाच्या प्रदेश सचिव पदी धनंजय कुलकर्णी तर मराठवाडा सचिव पदी चंद्रकांत पाटील यांची निवड
अंबाजोगाई/प्रतिनिधी :-
भारतीय जनता मजूर संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. शांताप्रकाशजी जाटव भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रशिक्षण प्रभारी अनुसूचित जाती व जन जाती प्रमुख यांच्या आदेशानुसार भारतीय जनता मजदुर संघाचे राष्ट्रीय सचिव भाऊसाहेब घोडके यांनी प्रदेश सचिव पदी धनंजय कुलकर्णी यांची नियुक्ती केली तर मराठवाडा विभागीय सचिव पदी चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती केली आहे.यावेळी असंघटित मजूर यांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करणारी संघटना असून यासाठी राज्य स्तरावर विविध विभागाची बांधणी करून सर्व विभागाच्या मजूर व गोरगरीब लोकांसाठी काम करण्यासाठी आदेशीत केले.भारतीय जनता मजदूर संघ हा भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करणारी संघटना असून या संघटनाच्या सर्व प्रकारच्या माध्यमातील काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे.औदयोगिक विभाग,सामाजिक विभाग,पत्रकारिता, सिनेमा,हॉटेल,जिंनीग कामगार,ऑईल मिल कामगार,साखर कारखाना कामगार, स्कुल कामगार,तसेच असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार अशा सर्व विभागातील कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तसेच बांधकाम मजुरांना ज्या सुविधा सध्या मिळत आहेत त्या सर्व सुविधा इतर कामगारांना पण मिळायला हव्यात यासाठी काम करायचे आहे.यासाठी गाव पातळी पासून ते देश पातळीपर्यंत सांघिक बांधणी करत सामाजिक विकास साध्य करायचा आहे व भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या संकल्पनेला सार्थ ठरवण्यासाठी काम करायचे असल्याचे राष्ट्रीय चिटणीस श्री.भाऊसाहेब घोडके यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी श्रीनिवास केजकर,शिवराज मुथळे, संदीप भूतडा हे यावेळी उपस्थित होते.याप्रसंगी धनंजय कुलकर्णी व चंद्रकांत पाटील यांना निवडीचे पत्र देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांचे केज अंबाजोगाई परिसरात अभिनंदन केले जात आहे..




