डॉ.योगेश क्षीरसागरांना मोठा धक्का ! पंडित गट 52 जागांवर मैदानात.
बीड नगरपालिकेचे सूत्रे पंडित गटाच्या हाती;डॉ.योगेश क्षीरसागर गटात शांतता.

बीड नगरपालिका निवडणूक जाहीर होताच शहरात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. आज (14 नोव्हेंबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या ‘शिवछत्र’ निवासस्थानी पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून तब्बल 52 जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे डॉ. योगेश क्षीरसागरांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. क्षीरसागर गट आणि पंडित गट यांच्यात जागावाटपावर अंतिम समन्वय न साधल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार बीड नगरपालिकेची संपूर्ण सूत्रे अमरसिंह पंडित गटाकडे सोपवण्यात आल्याची माहिती बांधकाम सभापती विनोद मुळूक यांनी दिली.
या घडामोडींनंतर डॉ. योगेश क्षीरसागर आगामी निवडणुकीत कोणती रणनीती स्वीकारणार, ते स्वतंत्र लढणार की नव्या युतीचा मार्ग निवडणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. काही तासांतच क्षीरसागर गटाची भूमिका स्पष्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत.
पंडित गट 52 जागेवर निवडणूक लढणार असल्याने डॉक्टर योगेश क्षीरसगर यांच्या गटात शांतता पसरली असून काय निर्णय डॉक्टर योगेश क्षीरसागर हे आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याची शक्यता असून त्यांच्या या निर्णयाकडे अवघ्या बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.







