प्रभाग क्रमांक ४ मध्ये “टायगर”राकेश जाधव यांचीच जोरदार चर्चा.
जनसेवा आणि सामाजिक उपक्रमांतून घडवली स्वतंत्र ओळख.

टायगर ग्रुपच्या माध्यमातून रस्ते, नाल्या, मोफत पाणीपुरवठा, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, रुग्णासाठी मोफत रुग्णवाहिका,आरोग्य शिबिर ते होतकरू महिलांना शिलाई मशीन वाटपापर्यंत अनेक जनहित उपक्रम २४ तास लोकांसाठी उपलब्ध असणाऱ्या राकेश जाधव यांच्या उमेदवारीची मागणी जोर धरतेय.
बीड : आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव. सामाजिक कार्य, लोकसेवा आणि तत्पर जनसंपर्कामुळे राकेश जाधव हे या प्रभागातील लोकांच्या मनात ठसा उमटवणारे नाव ठरत आहेत.
प्रभागातील अडचणी, गोरगरीबांच्या समस्या आणि दैनंदिन प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या राकेश जाधव यांची ओळख “जनतेचा हक्काचा माणूस” अशी झाली आहे. टायगर ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी प्रभागातील अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.गेल्या काही वर्षांत रस्ते, नाल्या,दवाखाना,पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयांमधील निराधारांची अनेक प्रश्न सोडवून देण्यात त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे, दुष्काळी परिस्थितीत मोफत पाणी टँकर उपक्रम राबवून आई लोणावळ्यात नागरिकांची तहान भागवली होतो या प्रभागात हा उपक्रम गत तीन वर्षांपासून सातत्याने सुरू आहे.यामुळे प्रभागातील जनतेला हक्काचा माणूस म्हणून राकेश जाधव यांचे नाव सर्वतो परिचित झाले आहे.या शिवाय राकेश जाधव यांनी टायगर ग्रुप च्या माध्यमातून निराधार माता-भगिनींना मोफत शिलाई मशीन वाटप,रक्तदान शिबिरे,साडी वितरण,सांस्कृतिक सणांच्या निमित्ताने मोफत किराणा किट व धान्य वाटप,,वृक्षारोपण मोहिमा अशा विविध सामाजिक कार्यांद्वारे लोकांशी घट्ट नातं जोडले आहे.
त्यांच्या कार्यशैलीतील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे ते २४ तास जनसेवेसाठी उपलब्ध असतात. प्रत्येक नागरिकाच्या अडचणींमध्ये स्वतः सहभागी होऊन उपाय शोधणारा असा लोकाभिमुख नेता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
या सातत्यपूर्ण कार्यामुळे वॉर्ड क्रमांक ४ मधील नागरिक आता राकेश जाधव यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळावी आणि विजयी व्हावे अशी जोरदार मागणी करत आहेत.
“विकास आणि जनसेवा हेच माझं ध्येय!” असा विश्वास राकेश जाधव यांनी व्यक्त केला असून, त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यास वॉर्ड क्रमांक ४ मध्ये निवडणूक रंगणार हे निश्चित मानलं जात आहे.











