योगेश्वरी वधुवर सूचक पुस्तिका प्रकाशन आणि समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
जेष्ठ समाज सेवक नंदकिशोरजी मुंदडा (काकाजी) यांच्या हस्ते वितरण.

योगेश्वरी वधुवर पुस्तक प्रकाशन आणि समाजभूषण पुरस्काराचे वितरण सोहळा सम्पन्न
अंबाजोगाई- अभय जोशी :–
दि ३० ऑक्टोबर २५ रोजी योगेश्वरी वधुवर सूचक यांचे पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले,याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवराना समाजभूषण पुरस्काराने जेष्ठ समाजसेवक नंदकिशोरजी मुंदडा यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या मध्ये सामाजिक कार्य- शुभांगी पत्की,वैद्यकीय कार्य डॉ प्रवीण जोशी, वधुवर सूचक सेवा कार्य मुकुंद घाटे,आध्यत्मिक कार्य दुर्गादास दामोशन यांना समाजभूषण मानपत्र,शाल पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी डॉ दिलीप कुलकर्णी यांनी पुरस्कार प्राप्त कर्ते याचे कौतुकास्पद गौरव भाषण केले. यकार्यक्रमास संजय लोणीकर,सौ मंजुषा जोशी, नंदकिशोरजी मुंदडा,चिक्षे,डॉ शिवाजीराव चौसाळकर,दिनेश परदेशी,प्रभाकरराव सेलमोकर,राहुल देशपांडे, संजय देशपांडे, भास्कर देशपांडे, मंदार काटे,पद्मनाभ देशपांडे,महिला आणि मोठ्या प्रमाणात समाजातील मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी केले.

