
अंबाजोगाई- अभय जोशी
अमृत २.० योजने अंतर्गत अंबाजोगाई मधील मंजूर असलेल्या २ उद्यानाचे सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन आमदार सौ नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते योगेश्वरी मंदिर परिसर येथे करण्यात आले.
अंबाजोगाई शहर विकास कार्यासाठी सतत प्रयत्नशील असून आम जनतेचा आरोग्य, मोकळी हवा,पर्यावरण यासाठी हक्काचे २ उद्याने अद्ययावत सुविधांनी युक्त,मुलांना खेळणे, मॉर्निग वॉक साठीचा ट्रॅक,पर्यावरण पूरक वातावरण असे २ उद्याने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नंदकिशोरजी मुंदडा,अक्षय भैय्या मुंदडा,भ ज प प्रवक्ते राम कुलकर्णी, रोहिणी पाठक, शोभा लोमटे,डॉ अतुल देशपांडे, गिरीधारीलाल भराडीया,धर्मराज सोळंके,वाजेद खतीब,उल्हास पांडे,सारंग पुजारी,संजय गम्भीरे, प्रशांत आदनाक,वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवराची तसेच मोठया प्रमाणात नागरिक, महिला यांची उपस्थिती होती. या वेळी सूत्रसंचालन प्रकाश बोरगावकर यांनी केले शेवटी अल्पोपहार करण्यात आला.

