बीड जिल्हा

उप प्रादेशिक कार्यालय अंबाजोगाई येथे निवेदन दिले

चालकमालक संघटना अंबाजोगाई यांनी..

 

अंबाजोगाई- अभय जोशी :—
जुने हस्तलिखित असलेले वाहने ऑनलाईन ४.० प्रणालीत नोंद करणे बाबदचे निवेदन दि १४/१०/३५ रोजी जोगाईवाडी आर टी ओ यांच्याकडे दाखल करण्यात आले.
३ते४ महिने झाल्या नंतरही वाहने ऑनलाईन झालेली नाहीत ,यामुळे वाहनधारकांना नाहक होणारा दंड,१५ वर्षा नन्तरची नोंदणी, HSRP क्रमांक अश्या अनेक अडचणी झाल्याने मनस्थाप होत आहे. हि कामे मुंबई कार्यालयातून होत नसल्याचे सांगितले जाते. या सर्वच प्रश्नावर सुकर मार्ग काढावा अशी मागणीही करण्यात आली.”चालकमालक संघटना चे सर्वच प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन हे निवेदन मो वा नी भोसले साहेब यांच्याकडे सादर केले यावेळी कार्यालयीन कर्मचारी पाटील हे उपस्थित होते.तसेच HSRP क्रमांक ची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर २५ असल्याचेही सांगण्यात आले.कार्यालयीन पाठपुरावा करून वाहनधारक यांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी विनंती करण्यात आली.
या वेळी शरद घनचेकर,सलीम पठाण, शेरुभाई,मुकुंद जोशी, अभय जोशी,काजगुंडे,सुशील भुसारी, रवींद्र मुळे, आदिनाथ शेप,शाम कांबळे,मधुकर तिडके,रायचुरकर,म्हाळणमर,नितीन भुतडा,पवन

पवन लाहोटी,सुधीर गिलडा, इम्रान पठाण,परवेज,शहबाज,राहुल बसवर,विशाल जोगदंड,अरुण गिराम,होके,नरारे, आदमाने, वाघमारे,स्लिम शेख, ऐराज, विठ्ठल गुलभिले,मोहिते,प्रदीप घाडगे,इत्यादी यांनी निवेदनावर सह्या करून सर्वांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button