ब्रेकिंग न्यूज

“चक्री”जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांचा छापा.

19 हजाराच्या मुद्देमालसह एक ताब्यात;पो.नि.प्रवीणकुमार बांगर ॲक्शन मोडवर.

बीड(प्रतिनिधी) बीड शहरातील पालवन चौक परिसरात सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीला ताब्यात घेत १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने शहरातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांत एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (दि.९) गुप्त माहितीच्या आधारे पालवन चौक येथील मधुबन बीअर बारसमोरील उघड्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांनी दुपारी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जुगारी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र राहुल सुधाकर हजारे (वय ३०, रा. गोविंद नगर, धानोरा रोड, बीड) हा इसम पोलिसांच्या ताब्यात सापडला.

चौकशीत तो संगणकाच्या माध्यमातून लोकांकडून पैसे घेऊन चक्री जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून ३ हजार २०० रुपये रोख, कॉम्पॅक कंपनीचा लॅपटॉप, विप्रो कंपनीचा की-बोर्ड आणि लॅपटॉप विवो केअर कंपनीचा माऊस असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याने अवैध धंद्यांविरोधात मोहीमच उघडली असून, मटका, जुगार व इतर बेकायदेशीर व्यवसायांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, पो.हे.कॉ.सचिन आगलावे व पो.हे.कॉ. रवींद्र आघाव यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button