माजलगावात अज्ञात वाहनाच्या धडकेने उंट जखमी.
उंटाच्या पायाला गंभीर दुखापत;अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.

माजलगाव दि.२४(तुकाराम येवले) माजलगाव गेवराई या राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात चार चाकी वाहनाने रोडवर चालणाऱ्या उंटाला जोराची धडक दिल्याने उंटाचा पाय मोडला आहे शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
उंटावर लहान मुलांना बसून आपला उदरनिर्वाह करणारे टाकरवन येथील कुटुंब आहे ते दररोजच्यासारखे आपला उंट घेऊन व्यवसाय करण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी दिनांक 24 मार्च रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास माजलगाव गेवराई रोड वरून माजलगावात येत असताना कन्यादान मंगल कार्यालयाच्या समोर माजलगाव कडून गेवराई कडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाने रोडवर चालणाऱ्या उंटाला पायाला धडक देऊन सदर चार चाकी वाहन धारक फरार झाला आहे या अपघातामध्ये उंटाच्या मागील उजव्या पायाला जबर मार लागल्याने त्या उंटाचा पाय मोडला आहे सदर उंट गंभीर जखमी झाला असून शेअर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदर उंटावर परभणी येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले आहे






