आमदार मतदारांना धमकावत आहेत : अमर नाईकवाडे.
अमृत सारडा पैसे वाटप करत असल्याचा केला गंभीर आरोप.काय म्हणाले अमर नाईकवाडे पहा.

बीड(प्रतिनिधी) बीड शहरातील प्रभाग क्रमांक तीन मधील राष्ट्रवादीचे उमेदवार अमर नाईकवाडे यांनी भाजपचे उमेदवार अमृत काका सारडा यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्याने हे प्रकरण न्यायालयात गेल्याने येत्या २० डिसेंबर प्रभाग क्रमांक तीन चे मतदान पार पडणार आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमर नाईकवाडे यांनी बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अमर नाईकवाडे यांनी असा आरोप केला आहे की, आमदार संदीप क्षीरसागरकांकडून मतदारांना भाजपचे उमेदवार अमृत (काका) सारडा यांना मतदान करण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. तसेच तुम्ही मतदाना दिवशी बीडमध्ये थांबायचे नाही या प्रकारामुळे प्रभागातील निवडणूक प्रक्रिया प्रभावित होत असल्याचा दावा नाईकवाडे यांनी केला आहे.
यासोबतच नाईकवाडे यांनी भाजपचे उमेदवार अमृत काका सारडा यांच्यावर देखील गंभीर आरोप करत, मतदारांना पैशांचे वाटप करून प्रलोभन दिले जात असल्याचा दावा केला आहे. हे सर्व प्रकार आचारसंहितेचा भंग करणारे असून लोकशाहीला धक्का देणारे असल्याचे नाईकवाडे यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकरणाबाबत निवडणूक आयोगाकडे व बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती अमर नाईकवाडे यांनी दिली असून, संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे प्रभाग क्रमांक तीनमधील निवडणूक अधिकच रंगतदार बनली असून, मतदारांचे लक्ष आता निवडणूक आयोग आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे.




