ब्रेकिंग न्यूज

अंबाजोगाई लातूर रोड वर अपघात ३ ठार ८ जखमी

या मध्ये रेणापूर - लातूर येथिल आहेत.

 

*अंबाजोगाई लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर स्कापिओ व हुंडाई एक्सेंटचा भीषण अपघात तीन ठार तर आठ जण गंभीर जखमी.*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई लातूर रोडवरील जिल्हा सरहद्दीवर स्कार्पिओ व हुंडाई एक्सेंट
च्या झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर आठ जण गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून सर्व जखमीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आसुन या
अपघाताने पुन्हा एकदा चार पदरी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या भीषण अपघाता विषयी प्राप्त माहिती अशी की, 15 डिसेंबर सोमवार च्या रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लातूर हुन (अंबाजोगाई) सायगाव च्या दिशेने निघालेली MH12 CY 7022 क्रमांकाची होंडाई एक्सेंट ही कार लातूर- बीड जिल्हा सरहद्दी वरील बर्दापूर नजीक आली असता समोरून अंबाजोगाई होऊन लातूरच्या दिशेने निघालेल्या MH24 V 7771 स्कापिओ गाडीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघाता नंतर बर्दापूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कांबळे व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी धावली व अपघातातील
मयत अमित सुभाष राऊत वय 36 वर्ष राहणार सोमवंशी नगर आर्वी तालुका जिल्हा लातूर, पृथ्वी रमाकांत जाधव वय 20 वर्ष राहणार खानापूर तालुका रेणापुर जिल्हा लातूर, निजामुद्दीन फसीयुद्दीन शेख व 37 वर्ष राहणार सोमवंशी नगर आर्वी तालुका जिल्हा लातूर या तीन जणांचा उपस्थित जनसमुदायाच्या मदतीने बाजूला काढून उर्वरित अश्विनी गंगासागर स्वामी व 28 वर्ष, प्राची गंगासागर स्वामी वय 07 वर्ष, वीरभद्र उमाकांत स्वामी वय 40 वर्ष, सरस्वती वीरभद्र स्वामी वय 32 वर्ष, महेश रमाकांत स्वामी वय 31 वर्ष, गणेश रमाकांत स्वामी वय 25 वर्ष सर्व राहणार आरजखेडा तालुका रेणापूर जिल्हा लातूर, दिशान इस्माईल सय्यद वय 20 वर्ष राहणार काळे गल्ली लातूर, अरबाज रहमत शेख वय 21 वर्ष राहणार रेणुका नगर लातूर या आठ गंभीर जखमीला सरकारी दवाखाना लातूर येथे उपचारासाठी रवाना केले.
सर्व मयत व्यक्तीचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात विच्छेदन सुरू आसल्याची माहिती बर्दापूर येथील पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी दिली आहे.

*अपघाताने एकदा चार पदरी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर*

लातूर हुन अंबाजोगाई कडे जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ता लातूर बीड जिल्हा सरहद्दीपर्यंत चार पदरी आणि पुढे अंबाजोगाईपर्यंत दोन पदरी असल्या कारणाने जिल्हा सरहद्दी पर्यंत येणाऱ्या वाहनाची वाहतुक एकतर्फी असून पुढे अंबाजोगाई पर्यंत ही वाहतूक समोरासमोर होत असल्याने यापूर्वी अनेक वेळा या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांचे बळी गेलेले आहेत त्यामुळे जिल्हा सरहद्दी पासून लोखंडी सावरगाव पर्यंत हा रस्ता चार पदरी बनवण्यात यावा अशी मागणी वारंवार होत असून काही महिन्या पूर्वीच केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या चार पदरी रस्त्याच्या कामाला मंजुरीही दिलेली आहे.

सदर चार पदरी रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव शासन दरबारी गेलेला असून काल झालेल्या या अपघाताने पुन्हा एकदा या चार पदरी रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आले आहे असेच म्हणावे लागेल.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button