नगरपालिका कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात..
बीड जिल्ह्यातील शासकीय कार्यालय झाले भ्रष्टाचाराचे कुरण.

बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात लाचखोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, नगरपालिके सारख्या सर्वसामान्यांच्या कामासाठी असलेल्या कार्यालयातही भ्रष्टाचाराने शिरकाव केल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बीड चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आजच नागपूर हिवाळी अधिवेशनात बोगस गुंठेवारी विषयी प्रश्न उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर आज बोगस गुंठेवारी प्रकरणे कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली.
बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय कामच होत नसल्याचे चित्र सध्या बीडमध्ये पाहावयास मिळत आहे.पैशासाठी अडवणूक होत असल्याच्या देखील अनेक तक्रारी आहेत.
बीड नगरपरिषदेत अभिलेख विभागातील कर्मचारी आशिष मस्के यांना गुंठेवारीची सत्यप्रत देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि. ९) रंगेहाथ पकडले.
बीड नगरपालिकेतील इतर विभागात देखील पैशाची मागणी होत असल्याची माहिती मिळत आहे.
या कारवाईनंतर नगरपालिका परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक असलेल्या कागदपत्रांसाठी देखील लाच मागितली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
ही कारवाई बीड एसीबीचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. बीड नगरपालिकेतील मोठे मासे गळाला लावावे तरच भ्रष्टाचार, लाचखोरीचे प्रमाण कमी होईल.
नागरिकांचे काम थांबवून लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
ही कारवाई सापळा पथकः – पोलीस उप अधीक्षक सोपान चिटमपल्ले,पोनि श्री राहुलकुमार भोळ, पो.नि.समाधान कवडे, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार, पांडुरंग काचगुडे, अनिल शेळके, अमोल खरसाडे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदिप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, बिभीषण सांगळे, अंबादास पूरी गणेश म्हेत्रे सर्व ला.प्र.वि. बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.









