बीड स्ट्रॉंग रूमच्या बाहेर कार्यकर्त्याचा रात्रंनदिवस खडा पहारा.
EVM मशीनवर संशय;कार्यकर्ते काय म्हणाले पहा.

बीड(प्रतिनिधी)बीड नगरपरिषद निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी पार पडले. नियोजनानुसार मतमोजणी ३ डिसेंबरला होणार होती; मात्र नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार मतमोजणी आता २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या निर्णयानंतर शहरात राजकीय वातावरण तापले असून, सर्वांच्याच नजरा २१ डिसेंबरकडे लागल्या आहेत.
देशभरात ईव्हीएम मशीनबाबत संशयाचे आवाज उठताना दिसत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित केली असून, परळी परिसरातही ईव्हीएमवरून मोठा तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर बीडमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलेल्या ईव्हीएम मशीनभोवती कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी कठोर सुरक्षा व्यवस्था उभारली असून, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि समर्थक देखील बीड कृषी उत्पन्न बाजार समिती येथील स्ट्रॉंग रूमच्या बाहेर दिवस-रात्र पहारा देताना दिसत आहेत.
ईव्हीएमवरील संशय, मतमोजणीतील विलंब आणि शहरातील वाढते राजकीय समीकरण यामुळे बीडमधील वातावरण तापले आहे. आता २१ डिसेंबरच्या मतमोजणीचा निकाल कोणत्या दिशेने वळणार, याची उत्सुकता शहरवासीयांमध्ये शिगेला पोहोचली आहे.







