ब्रेकिंग न्यूज उद्याची मतमोजणी रद्द.
मतमोजणी 21 डिसेंबरला ! नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा आदेश.

बीड (प्रतिनिधी) – नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची उद्या होणारी मतमोजणी अखेर रद्द करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार आता मतमोजणी 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.
या निर्णयामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरातील उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीचा निकाल जाणून घेण्यासाठी आतुर झालेले उमेदवार आणि कार्यकर्त्यांची प्रतीक्षा आणखी वाढली असून निकालासाठी आता आणखी 21 डिसेंबरपर्यंत थांबावे लागणार आहे. अचानक झालेल्या बदलामुळे अनेकांच्या ‘झोपेचे खोबरे’ उडाले असल्याचेही दिसून येत आहे.
दरम्यान, आचारसंहिता 20 डिसेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मतमोजणी पुढे ढकलल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली असून या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
आता नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांवर कोण विराजमान होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरकडे लागले आहे.







