ब्रेकिंग न्यूज

प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपकडून मीना अशोकराव जाधव यांना उमेदवारी.

राकेश जाधव यांच्या सामाजिक कार्यामुळे स्थानिक जनतेतून मोठा पाठिंबा.

बीड( प्रतिनिधी) डॉ. योगेश क्षीरसागर यांचे समर्थक व टायगर ग्रुप जिल्हाध्यक्ष राकेश जाधव यांच्या मातोश्रीना पेठ बीड भागातील प्रभाग क्रमांक ०४ मधून भारतीय जनता पक्षाकडून मीना अशोकराव जाधव यांना उमेदवारी देण्यात आली.

राकेश जाधव यांनी आतापर्यंत केलेल्या समाजसेवा व गोरगरिबांना मदत यावरून डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या शिफारसी वरून उमेदवारी निश्चित करण्यात आली.. 

  बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस होता. उमेदवारी दाखल करण्यासाठी जाधव यांच्यासोबत कुटुंबिय व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राकेश जाधव यांच्या सामाजिक कार्याचा लाभ उमेदवारीला :

मीना अशोकराव जाधव यांच्या उमेदवारीला त्यांचे पुत्र राजेश व राकेश जाधव यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक कामांचा मोठा आधार मिळत आहे. आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक उपक्रमांमध्ये राकेश यांचा सक्रिय सहभाग राहिल्याने स्थानिकांमध्ये त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आहे. तसेच राजेश जाधव यांची व्यावसायिक क्षेत्रातील ओळखही घट्ट असल्याने जाधव परिवाराला प्रभागात चांगला पाठिंबा असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे.

टायगर ग्रुपच्या माध्यमातून राकेश जाधव यांनी गेल्या काही वर्षांत अनेक उपक्रम राबवले आहेत. दुष्काळी परिस्थितीत सलग तीन वर्षे मोफत पाणीटँकरसारखा उपक्रम राबवून त्यांनी प्रभागातील नागरिकांना मोठा दिलासा दिला होता. तसेच रस्ते, नाल्या, दवाखाने, पोलीस ठाणे व तहसील कार्यालयांमधील अडचणी सोडवून देण्यातही त्यांनी पुढाकार घेतला आहे.

नागरिकांचा विश्वास जाधव यांच्यावर

स्थानिक नागरिकांनीही मीना जाधव यांच्या उमेदवारीचं स्वागत करताना त्यांना “सामाजिक बांधिलकी असलेल्या उमेदवार” असे संबोधले. प्रभागातील समस्या जाणणाऱ्या, लोकसेवेत तत्पर आणि विकासकामांची देखरेख करणाऱ्या उमेदवार म्हणून मीना जाधव यांच्याकडे मतदार सकारात्मकतेने पाहत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उमेदवारीनंतर जल्लोष :

मीना अशोकराव जाधव यांची अधिकृत उमेदवारी निश्चित झाल्यानंतर समर्थकांनी प्रभागात फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला. निवडणुकीत भाजपला या उमेदवारीमुळे मजबूत बळ मिळेल, असा विश्वास भाजप कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button