ब्रेकिंग न्यूज

गोरक्षकास झालेल्या अमानुष मारहाणीवर चौकशीचे आदेश !

महामार्ग पोलीस अधिकारी माधुरी मुंडेचे वादग्रस्त वर्तन !

बीड (प्रतिनिधी) गेवराई तालुक्यातील पाडळशिंगी टोल नाक्यावर गोरक्षकास झालेल्या अमानुष मारहाणीच्या प्रकरणात अखेर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तातेड यांनी या घटनेकडे गंभीरतेने पाहत गृह विभागाचे प्रधान सचिव आणि स्थानिक पोलिसांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

काय घडले होते?

दिनांक ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गोरक्षक गहिनीनाथ पाळवदे व केशव रत्नपारखे यांनी पाडळशिंगी टोलनाक्यावर बेकायदेशीररीत्या जनावरांची वाहतूक होत असल्याचे पाहिल्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वाहन रोखले, मात्र गुन्हा नोंदविण्याऐवजी कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचाऱ्यांनी दोन्ही गोरक्षकांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. यासोबतच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्नही झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. जखमी पाळवदे हे बीड शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन पुढील चौकटीसाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाले होते, बाळू यांना झालेल्या मारहाणी मुळे त्यांना संबंधित अधिकाऱ्यांवर बुरी दाखल करावे अशी मागणी केली होती त्यामुळे त्यांची चौकशी करण्याचा आदेश आज देण्यात आले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अशोक जैन यांनी प्राणी कल्याण समितीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर समितीचे अध्यक्ष तातेड यांनी संबंधित विभागाला चौकशीचे आदेश दिले असून आता या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

या आदेशांमुळे गोरक्षकांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button