बीड नगराध्यक्ष पदासाठी AIMIM उमेदवारी जाहीर.
पक्ष श्रेष्ठीकडून वाजेद इनामदार यांची उमेदवारी जाहीर

बीड (प्रतिनिधी):बीड नगरपालिकेच्या महिला अनुसूचित जातीसाठी आरक्षित नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार शोधाचे प्रयत्न सुरू होते. आज अखेर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाने आपल्या उमेदवाराची घोषणा केली असून वाजेद इनामदार यांना बीड नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
वाजेद इनामदार हे बीड शहरातील बार्शी नाका मोमिनपुरा परिसरातील रहिवासी असून ते सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. समाजसेवेत सातत्याने कार्यरत राहून त्यांनी शहरातील सर्वच समाजघटकांमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. सर्व जाती-धर्मातील नागरिकांना आणि युवकांना सोबत घेऊन काम करणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
नगराध्यक्ष पदासाठी मुस्लिम समाजाचे मतदान निर्णय ठरणार असून याच मतावर बीड नगराध्यक्ष ठरणार असल्याची चर्चा बीड शहरात होत आहे.
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शफिक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली इनामदार यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली. पक्षातील युवा कार्यकर्त्यांचा त्यांना मोठा पाठिंबा असून, या पाठिंब्याच्या जोरावर त्यांची ही निवडणूक अधिक दमदार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








