सराईत दुचाकी चोरी सीसीटीव्हीत कैद ! चोराची माहिती देणाऱ्यास बक्षीस.
दुचाकीचोर दिसल्यास संपर्क : उपनिरीक्षक जाधव: 9021216256

बीड (प्रतिनिधी) : बीड शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढ आहे. दुचाकी चोरीचा प्रमाणात वाढ झाल्याने पोलिसांना एक प्रकारचे आवाहन झाले आहे. दिनांक ४ नोव्हेंबर रोजी बीड शासकीय रुग्णालयाच्या पोलीस चौकीसमोरून दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या.
विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी रुग्णालयातील पोलीस चौकीचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. इन्व्हर्टर नसल्याने त्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, त्यामुळे चोरटे निर्धास्तपणे चोरी करून पसार झाले.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, चोरट्याचा चेहरा इतर सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आला आहे. संबंधित चोरटा यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक दुचाकी चोरल्याचा संशय आहे.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर हा चोरटा दिसला किंवा त्याच्याबाबत काही माहिती मिळाली, तर त्वरित बीड शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव (मो. 9021216256) यांच्याशी संपर्क साधावा.
शहरात दिवसा ढवळ्या होणाऱ्या या चोरीच्या घटना पोलिसांसमोर नवीन आव्हान बनल्या आहेत, तर नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकी चोराची माहिती देणाऱ्यास बीड शहर पोलिसांकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.











