ब्रेकिंग न्यूज

मोबाईल नोट मध्ये नाव टाईप करून आत्महत्या !

मोबाईल मध्ये SDPO वाघमारे,CO अंधारे,कदम,तिडके व काळेचे नाव.

बीड(प्रतिनिधी)बीड नगरपरिषद कर्मचारी धांडे यांनी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी बीड नगरपालिकेतील टेरेसवर असलेल्या लोखंडी सीडीला गळफास घेतल्याने एकच खळबळ उडाली.

 धांडे यांच्या आत्महत्या प्रकरणी अनेकांची नावे जोडले जात असून, मयताने आत्महत्या पूर्वी डीपीओ संभाजी वाघमारे, पूर्वीच्या सीओ निता अंधारे, सम्राट कदम, विश्वांभर तिडके यांच्यावर आरोप कले आहे. हा मजकूर मयत धांडे यांच्या मोबाईल मध्ये नोट पॅड मध्ये आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांच्या तपासातच याबाबत खुलासा होईल.

   अविनाश धांडे असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून, ते नगरपरिषदेत वसुली विभागात कार्यरत होते. शुक्रवारी (दि.७) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास नगरपरिषद इमारतीच्या छतावर लोखंडी शिडीला गळफास घेतलेल्या अवस्थेत अविनाश धांडे यांचा मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला होता. सकाळी याप्रकरणी मयताचा मोबाईल तपासला असता त्यात नोट पॅड मध्ये धक्कादायक मजकूर आढळला आहे. यात त्यांनी डीपीओ संभाजी वाघमारे यांनी अनुभव नसणाऱ्या प्रमोशन दिले असून, जे प्रमोशनच्या लायक आहेत त्यांना डावलण्यात आले. तत्कालीन सीओ निता अंधारे यांनी सीआर वर मार्क कमी दिले आहे.

     तसेच वसुली विभागातील सम्राट कदम व विश्वांभर तिडके यांनी दाम करी काम इतकेच काम केले. चंद्रकांत काळे यांनी माझा पुरेपूर फायदा घेतला असा मजकूर आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून, ही नावे समोर आल्याने यांचा त्रास होता का? की, प्रमोशनाच्या लायक असताना ही डावलल्याने हा पाऊल उचलले की, काय? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा पोलीस आता तपास करतील त्यातून हे नेमकं प्रकार काय हे निष्पन्न होईल. तसेच त्यांनी या नोट पॅडवर मित्रांची माफी मागितली असून, इतर वैयक्तिक व्यवहार बाबतीत उल्लेख आहे. तसेच सध्याचे सीओ फडसे यांना उद्देशून लिहिताना साहेब माझा कुटुंबाला परेशानी होऊ देऊ नका. वेळेवर त्यांना माझा पीएफ व इतर वेळेत द्यावे असे आवाहन करीत तुम्ही अभ्यासु आहात माझा तुमच्यावर विश्वास आहे असा मजकूर आहे. यामुळे याची पूर्ण चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

मोबाईल नोट पड मधील मजकूर :

 1)अनुभव नसतांना डीपीओ संभाजी वाघमारेंनी प्रमोशन दिले;

2)निता अंधारेंनी सिआर वर मार्क कमी दिले.

3)सम्राट कदम, विश्वंभर तीडके, चंद्रकांत काळे यांना कंटाळल्याचा मजकूर. 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button