ब्रेकिंग न्यूज

दगड बांधून तलावात टाकलेल्या बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला.

दोघे अटकेत,वडवणी पोलिसांनी उलगडले महीलेच्या मृत्युचे रहस्य

वडवणी दि.५ (प्रतिनिधी):- खंडोबाची वाडी येथील आशाबाई करांडे शेतातून घरी परतत असताना सायंकाळी ७ वाजे सुमारास हरवल्या अशी मिसिंग तक्रार दिली होती. या महीलेचा शोध सुरू असताना दि. २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजे सुमारास सदर महिलेचे प्रेत डोंगरवाडी खडकी शिवारातील पाझर तलावात एक दगड बांधलेल्या अवस्थेत तरंगताना दिसले.

पोलीसांनी सदर प्रेत अंबाजोगाई येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांचे ताब्यात दिले. सदर प्रकरणात आत्महत्या, हत्या की अपघात असा कोणताच अंदाज लावणे शक्य नव्हते. त्यामुळे या महीलेचा मृत्यू नेमका कसा झाला? कुणी घडवुन आणला हे उघडकीस आणणे बस वडवणी पोलीसांपुढे मोठे आव्हान होते. दरम्यान वडवणी हवीत पो.उप. विभागीय अधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी घटनास्थळ भेट देवून तपासा बाबत मार्गदर्शन केले व त्यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस तपास करत असताना सदर तलावाचे विरूद्ध दिशेस असलेल्या खंडोबाचीवाडी शिवारात काही शेतकऱ्यांनी जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण हावे यासाठी इलेक्ट्रीक तारेचे कुंपण रात्रीच्या वेळी घातलेले आहे. संपूर्ण परिसराची पाहणी केली असता पोलीसांना ती तार दिसुन आली यावरून तिला इलेक्ट्रीक करंट लागून तिचा मृत्यु होवु शकतो या अंदाजापर्यंत पोलीस असा संशय आला. संशयित व्यक्ती हनुमंत महादेव कांबीलकर व गणेश महादेव कांबीलकर यांची विश्वासान घेवुन चौकशी केली असता सदर दोन्ही आरोपीनी सदर महीला ही त्यांचेच शेतात करंट लागुन पडली होती व सदर अनोळखी महीलेबाबत कुणालाही काही कळु नये, म्हणून पुरावा नष्ट करण्या साठी सदर महीलेचे प्रेत दोन्ही भावडांनी डोंगराचीवाडी शिवारात दगड बांधुन टाकले, अशी कबुली दिली. सदर प्रकरणात मयत महीलेच्या मुलाचे तक्रारी वरून गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजु राठोड नेम. वडवणी पो. स्टे हे करत असुन आरोपींना मा. न्यायालयाने १० नोव्हे २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके, डीवायएसपी शैलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वडवणी पोलीस ठाण्याच्या स.पो.नि. वर्षा व्हगाडे, पि.एस. आय. राजु राठोड, साहाय्यक फौजदार आदीनाथ तांदळे, पोह विलास खरात, पो. अंमलदार नवनाथ लटपटे, राम शिनगारे यांनी केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button