ब्रेकिंग न्यूज
जोगाईवाडी- आर टि ओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर खड्डा.
शाळा, शासकीय कार्यालय, इंडस्ट्रीज असलेल्या रोड वेळीच लक्ष द्यावे.

जोगाईवाडी-आर टि ओ कार्यालयाकडे जाणाऱ्या रोड वर खड्डा !
अंबाजोगाई -वार्ताहर :-
जोगाईवाडी- आर टि ओ कार्यालयाकडे जाणाऱ्या वळणावर बऱ्याच दिवसापासून वर खड्डा असून तो वरचेवर मोठा होत आहे . या शासन,गुत्तेदार यांनी लक्ष देउन तो बंद करावा.
विशेष म्हणजे याच रस्तावर पुढे रोड खालची जमीन धसली असून तिथे ही रोडला खड्डा झाला आहे. या रोडवर शाळा असून शाळेच्या गाड्यांची रोज येजा मोठ्या प्रमाणात चालूच असते,काही इंडस्ट्रीज आहेत,पुढे न्यायधीश निवासाकडे ही हाच रोड जातो आणि आत्ताच्या आर टि कार्यालयात वाहनांची येजा चालूच असते असे असतानाही या कडे दुर्लक्ष करता येत नाहीत . अन्यथा कोणाच्या तरी जिवावर बेतू शकते . या साठी वेळीच यावर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी वाहन धारकाकडून होत आहे.




