वेश्या व्यवसायावर AHTU चा छापा.
दोन पीडित महिलांची सुटका.PSI पल्लवी जाधव यांची धडक कारवाई.

बीड (प्रतिनिधी) — अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) बीडच्या चमूने तळेगाव परिसरात वेश्या व्यवसायावर मोठी कारवाई करत दोन पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणात वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांविरुद्ध बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना ३० ऑक्टोबर रोजी दुपारी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तळेगाव येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बाहेर जिल्ह्यातून महिलांना बोलावून वेश्या व्यवसाय सुरू आहे. त्यांनी ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असता, पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांना छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले.
यानुसार PSI पल्लवी जाधव, PI उमाशंकर कस्तुरे आणि त्यांच्या पथकाने डमी ग्राहक व पंचांच्या उपस्थितीत सापळा रचून कारवाई केली. डमी ग्राहकास १००० रुपयांच्या बदल्यात वेश्या गमनाची मागणी झाल्यानंतर इशारा मिळताच पोलिसांनी तत्काळ छापा मारला.
या कारवाईत माया अरुण कांबळे (वय ३८, रा. महाकुंडे वसती, तळेगाव) हिला अटक करण्यात आली. तिच्याकडून डमी ग्राहकाने दिलेल्या ५०० रुपयांच्या दोन नोटा जप्त करण्यात आल्या. चौकशीत तिचा साथीदार सुरेश नवनाथ भोसले (रा. महाकुंडे वसती, तळेगाव) याचाही सहभाग उघड झाला.
सदर ठिकाणावरून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून चौकशीत समोर आले की, हे दोघे आरोपी बाहेर जिल्ह्यातून महिलांना बोलावून त्यांच्या माध्यमातून आर्थिक लाभ घेत होते. ठिकाणी झडती घेतल्यावर ३४ विना वापरलेले निरोध सापडले आहेत.
या दोन्ही आरोपींवर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ६ व कलम ३(५) भा.दं.सं. अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली PI उमाशंकर कस्तुरे, PSI पल्लवी जाधव, महिला पोलीस हवालदार उषा चौरे, शोभा जाधव, पोलीस हवालदार प्रदीप येवले, अशोक शिंदे, तसेच पोलीस शिपाई गजानन चौधरी व उर्मिला म्हस्के यांच्या पथकाने केली.
👉 AHTU च्या धडक कारवाईमुळे तळेगाव परिसरातील वेश्या व्यवसायाला मोठा आळा बसला असून नागरिकांनी पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.



