जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा.
पाच आरोपींना अटक,₹ ३.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त.पिंपळनेर पोलिसांची धडक कारवाई.

बीड(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंदे करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या अनुषंगाने आज दिनांक ३०/१०/२०२५ रोजी पिंपळनेर पोलिसांनी मौजे मैंदा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा टाकून पाच इसमांना अटक केली आहे. आरोपींकडून ३,४९,४७०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईचा तपशील:
पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मैंदा शिवारात, मैंदा फाटा ते गाडी उतार तांडा रोडच्या उजव्या बाजूला विटभट्टी जवळ लिंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही इसम बेकायदेशीररित्या ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत व खेळवत आहेत.
या माहितीच्या आधारावर, पोलीस अंमलदार वैजिनाथ चंद्रकांत मगर यांच्या फिर्यादीनुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मधुसूदन घूगे,आणि पोलीस उपनिरीक्षक अर्जुन गोलवाल यांच्या पथकाने सायंकाळी १६.३० वाजता अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान, पाच इसम गोलाकारात बसलेले आणि जुगार खेळताना आढळून आले.
अटक आरोपींची नावे व जप्त मुद्देमाल:
पाच आरोपींची नावे : सुभाष गोपिनाथ चव्हाण (वय ४० वर्षे),गंपु गुंडीबा कसबे (वय ६० वर्षे),दिलीप शिवाजी घोरड (वय ३२ वर्षे),हनुमंत रामभाऊ लोकरे (वय ३८ वर्षे),शिवाजी रंगनाथ कसबे (वय ५५ वर्षे)सर्व रा. मैंदा, ता. जि. बीड.
जप्त केलेला मुद्देमाल: रोख रक्कम, मोबाईल, आणि पाच मोटारसायकली (हिरो स्प्लेंडर पल्स, बजाज डिस्कव्हर, बजाज बॉक्सर, बजाज प्लॅटीना) असा एकूण ₹ ३,४९,४७०/- (तीन लाख एकोणपन्नास हजार चारशे सत्तर रुपये) किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल:
या आरोपींविरुद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार बंदी कायदा प्रमाणे कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशन करत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अ.पो.अ.सचिन पांडकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक मधुसूदन घूगे, पो उप नी गोलवाल, पोलीस अंमलदार शेळके, गरजे, मगर, ढाकणे पठाण, विघ्ने, तावरे यांनी केली आहे.




