कॅनरा बँकेत धाडसी चोरी.
बँकेच्या मागील भिंत फोडून,गॅस कटरने लॉकर तोडून रोकड लंपास.घटनास्थळी पोलीस दाखल.

बीड : गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यामध्ये चोरीचे प्रमाण कमी झाले असतानाच आज धुळे–सोलापूर महामार्गालगत बीड शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर असलेल्या पाली ता.जि.बीड येथील मुख्य रस्त्यावर असलेली कॅनरा बँकेत गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडस चोरी केली. या घटनेत अंदाजे अठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर फोडून रोकड चोरून नेली. बँकेतील सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्याने उलटे करून ठेवले यामुळे थर्टी सीसीटीव्हीत कैद झाले नसून सोरटे हे सराईत असल्याचे दिसत आहे. बँकेतील चोरीची माहिती सकाळी कर्मचाऱ्यांना मिळताच एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चोरट्यांनी वापरलेली साधने, पावलांचे ठसे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. या घटनेमुळे पाली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.तरी बीड ग्रामीण पोलिसांनी आपल्या हद्दीत ग्रस्त वाढवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे.




