यश ढाका हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश शिराळेला अटक करा : निर्भीड पत्रकार संघ.
निर्भीड पत्रकार संघाने बीड पोलीस अधीक्षकांना निवेदन.गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसाची पत्रकार संघ भेट घेणार.

बीड ( प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे स्तर वाढत चालले आहे.यश ढाका या निष्पाप तरुणाचा टोळक्याने निघृण खून करण्यात आला.
बीड शहारातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या माने कॉम्प्लेक्स येथे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश देवेंद्र ढाका यावर टोळक्याने हल्ला करत चाकूने भोकसून खून करण्यात आला होता यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्या हत्या मधील सहभागी असलेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.मात्र या हत्या मागील मुख्य सूत्रधार गणेश शिराळे याला राजकीय पाठींबा असल्यामुळे त्याचा शोध घेण्यास बीड पोलिस टाळाटाळ करताना दिसून येत आहे.देवेंद्र ढाका यांनी पुरवणी जबाब मध्ये गणेश शिराळे हा या हत्या मागील मुख्य सूत्रधार असल्याचा जबाब पोलिसांना देऊन देखील आरोपीचा शोध घेत नसल्याने पोलिसाच्या कार्यपद्धती निर्माण होत आहे.
या गुंडाच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी. अशी मागणी निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. सदरील घटनेला एक महिना उलटून गेला तरी मास्टरमाईंड गणेश शिराळे हा फरार आहे. त्याच्या शोध घेण्यात येत नाही कि जाणूनबुजून आरोपीला पकडण्यात येत नाही? त्या आरोपीला राजकीय पाठिंबा कोणाचा आहे ? हे देखील तपासले पाहिजे.तरी मास्टर माईंड गणेश शिराळे याला लवकरात लवकर अटक करुन योग्य ती कड़क कायदेशिर कार्यवाही करण्यात यावी , नसता राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने प्रत्यक्ष भेट घेऊन या संदर्भात निवेदन देणार असल्याचे पत्रकार संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सदरील घटनेचा निर्भिड पत्रकार संघ बीडच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे. या निवेदनावर महिला जिल्हाध्यक्ष किरण डोळस, जिल्हा उपाध्यक्ष मोनिका बेदरे, जिल्हा सचिव आम्रपाली साबळे, राणीताई सामाजिक कार्यकर्त्या यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




