नगरपालिका निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढविणार : अनिलदादा जगताप
सर्वसामान्य घरातील नगराध्यक्ष निवडून आणणार.
बीड(प्रतिनिधी)बीड काही दिवसात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विशेष करुन सर्व नगरपालिका निवडणुका शिवसेना शिंदे गट पूर्ण ताकदीनिशी लढविणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केले आहे. तसेच त्यांनी यावेळी नगराध्यक्षपदासाठी प्रियांका गायकवाड, प्रीतम प्रतीक कांबळे ही दोन नावे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.
अनिलदादा जगताप यांच्या जालना रोडवरील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आज दुपारी शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी अशोक पटवर्धन, बापू मोरे, स्वप्नील गलधर,चंद्रकांत नवले आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख अनिल जगताप म्हणाले की, जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिंदे सेना पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहे. यासाठी जिल्हाभरात बैठका घेण्यात येत आहे. यामुळे शिंदे सेना निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहे. या पत्रकार परिषदेत अनिल जगताप यांनी बीड नगराध्यक्षपदासाठी प्रियांका गायकवाड, प्रीतम प्रतीक कांबळे ही दोन नावे जाहीर करण्यात आली. तसेच एकूण ३६ नगरसेवक आमच्याकडे निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे सांगितले असून, युती नाही झाली तरी आम्ही निवडणूक लढविण्यासा तयार असल्याचे म्हटले आहे. यामुळे एकप्रकारे शिंदे सेनेकडून नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले असल्याचे दिसून येत आहे. तसेच बीड नगरपालिकेच्या हद्दीत शासनाने ५०० कोटींची विकासकामे केली आहेत. तसेच हिंदू-मुस्लिम भेदभाव संपला असून सर्वांना सोबत घेऊन आम्हाला विकासाचे राजकारण करायचे असल्याचे संपर्क प्रमुख अशोक पटवर्धन यांनी म्हटले आहे. यावेळी इच्छूक उमेदवारांसह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




