बिंदूसरा नदीत स्त्रीलिंगी बाळाचा मृतदेह आढळला !
खासबाग/मोमीनपुरा जोडरस्त्या लगत पाण्यात मृतदेह आढळल्याने खळबळ.

बीड : बीड शहरातील बिंदूसरा नदी पात्रात आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी एका स्त्रीलिंगी बाळाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
बीड शहरातील खासबाग ते मोमीनपुरा जोड रस्त्यावर असलेल्या पाण्यात काहीतरी असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता तेथे बाळाचा मृतदेह असल्याचे दिसून आले. याची माहिती तात्काळ बीड शहर पोलिसांना देण्यात आली.
घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे. बाळ अंदाजे एक वर्षाचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याची माहिती शहरभर पसरली असून बिंदुसरा नदी पात्रात नागरिकांनी गर्दी केली होती.
बाळ दोन तीन दिवसापासून पाण्यात टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे,या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, बाळ नदीत कसे आले? बाळाला पाण्यात टाकले का? याचा तपास पोलिस करत आहेत. हा घातपात देखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही.सविस्तर वृत्त थोड्याच वेळात देण्यात येईल.




