रेड्याच्या टकरीवर बंदी आणून आयोजकावर कारवाई करावी : आदित्य जोगदंड
मुक्या प्राण्याच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार.

बीड आनंद वीर (प्रतिनिधी ) राज्यात जनावरांच्या ( रेड्यांच्या) टकरीवर, झुंजीवर बंदी असताना देखील बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मात्र दिवाळी,पाडव्या निमित्त जनावरांच्या टकरी लावल्या जात असल्याने अनेक जनावरे जखमी होत असून, या अमानुष प्रथेला आळा घालण्यासाठी ‘पेट शेल्ट फाउंडेशन, बीड’ या संस्थेने बीडचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदन दिले आहे.
दिनांक २२ ऑक्टोबर रोजी बीड ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील कोल्हारवाडी फाट्यावर जनावरांच्या टकरीचे आयोजन करण्यात आले होते. रेड्याच्या टकरीमध्ये अनेक जनावरे रेड्याना इजा झाल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांच्या उपस्थितीतच ही घटना झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
पेट शिल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य जोगदंड, उपाध्यक्ष सचिन जाधव,सचिव चंद्रकांत साबळे आणि मार्गदर्शक अक्षय गुरव यांनी बीड अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची भेट घेऊन ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत रेड्याच्या लावण्यात येणाऱ्या टकरी बंद करावी व अशा टकरीचे आयोजन करणाऱ्या वर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले.
जनावरांच्या टकरीसारख्या क्रूर प्रथेमुळे प्राणी जखमी होतात तसेच अशा प्रकारच्या स्पर्धा प्राणीसंवर्धन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे अशा अमानुष प्रथा थांबवून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. बीड जिल्हा पोलिस प्रशासनाने अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारावी व जनावरांवरील अत्याचार थांबवावेत, अशी मागणी पेट शेल्टर फाउंडेशनने केली आहे.
पेट शिल्ड संस्थेत मुक्या व जखमी प्राण्यांची सेवा करणाऱ्या आदित्य जोगदंड सह पशुप्रेमींनी बीड पोलिस अधीक्षक सह जिल्हाधिकारी यांना दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ रोजी निवेदन देण्यात आले असून, प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी फाउंडेशनने केली आहे. यावेळी पेट शिल्डचे पदाधिकारी आकाश वाघमारे,शुभम धन्वी उपस्थित होते.




