शेतातील सोयाबीनला अज्ञाताने लावली आग !
शेतकऱ्याचे नुकसान,अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल.

बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्याला यावर्षी मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.त्यातच फुले पिंपळगाव (ता. माजलगाव) येथील शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीला आग लावल्याने पिकाचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शेतकरी सुरेश सोपानराव सावळे (वय 55, रा. फुले पिंपळगाव, ता. माजलगाव, जि. बीड) यांनी माजलगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
सावळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 22 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजल्यापासून 23 ऑक्टोबर सकाळी 8.30 वाजेपर्यंत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गट क्रमांक 260 शिवारातील सोयाबीन पिकात डिझेल ओतून व काही प्रमाणात आग लावून पिकाचे नुकसान केले. यात अंदाजे 30 ते 35 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
घटनेची माहिती मिळताच साळवे यांनी शेतावर भेट दिली असता पिके जळाल्याचे आणि काही भागातील सोयाबीन पिक आगीत नष्ट झाल्याचे आढळून आले. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.तरी शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे





