ब्रेकिंग न्यूज

उपोषणाची दखल न घेतल्याने स्वप्निल वरपेचा आत्महत्येचा प्रयत्न.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील आश्वासन दिले होत.उपोषणाची,आंदोलनाची दखल न घेतल्याने उचलले टोकाचे पाऊल.

बीड (प्रतिनिधी) केज तालुक्यातील कोरडेवाडी या गावचा गेली 30 ते 35 वर्षापासून साठवण तलावासाठी संघर्ष चालू आहे.

कोरडेवाडी या गावांमध्ये गेली बारा दिवसापासून साठवण तलावासाठी राजश्रीताई पाटील यांच्यासह गावकऱ्यांचे आमरण उपोषण करण्यात आले होते, गावात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून पाण्यामुळे अनेक अडचणींना गावकऱ्यांना सामना करावा लागत आहे. पाण्याअभावी शेती ऊस पडू लागल्याने ग्रामस्थांनी मुंबई पुणे येथील कंपनीत जाऊन काम करत आहेत काही दिवसापूर्वी तहसील कार्यालयासमोर बैलगाडी जाळण्यात आली होती तर दोन दिवसापूर्वी जलसमाधी आंदोलन देखील करण्यात आले होते. तरी देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने व बारा दिवस उलटूनही कोणताच अधिकारी आमदार, खासदार किंवा लोक नेतेमंडळी यांनी कोणत्याच प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळे आज केज तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चॊका मध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. रस्ता रोको आंदोलन पाच तास सुरू असून सुद्धा अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधी कसल्याही प्रकारची दखल घेण्यात नाही. 

 मागील एक वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील गावकऱ्यांना कॉल द्वारे आश्वासन दिले होती तरी देखील आतापर्यंत आश्वासन पूर्ण कोणीच केले नाही. त्यामुळे आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी युवा नेते स्वप्निल वरपे यांनी आंदोलन स्थळीच  विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळेस त्यांना उपचारासाठी रुग्णाला दाखल केल्याने प्रकृती चिताजनक असणे त्यांना बीड येथील एका खाजगी रुग्णात उपचार सुरू आहे. उपोषणाची व आंदोलनाची दखल न घेतल्याने स्वप्निल वरपे यांनी टोकाचे पाऊल उचलले आता तरी लोकप्रतिनिधींना व अधिकाऱ्यांना जाग येईल का असा प्रश्न कोरडेवाडीतील ग्रामस्थांना पडला आहे. विष घेऊन  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने स्वप्नील वरपे यांच्या जीवित काही झाल्यास याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची व लोकप्रतिनिधी राहील असे व्हिडिओद्वारे सांगण्यात आले.तरी कोरडेवाडी गावात सध्या उपोषण सुरू आहे 

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button