संगीताताई वाघमारे याच नगराध्यक्षपदासाठी सक्षम व पात्र उमेदवार.
ग्राउंड लेव्हला व तळमळीने काम करणाऱ्या म्हणून संगीताताईची ओळख.

बीड (प्रतिनिधी) महाराष्ट्रात नगरपरिषद निवडणुकांची तयारी सुरू असून,बीड नगराध्यक्ष पद प्रथमच अनुसूचित जाती महिलासाठी जाहीर झाले.यामुळे बीड शहरातही नगराध्यक्ष पदासाठी विविध संभाव्य उमेदवारांची चर्चेला ऊत आला असताना समाजकार्य व स्थानिक समस्यांवर ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या संगीताताई वाघमारे यांचे नाव अग्रस्थानी आहे. गेल्या दोन दशकांपासून त्या समाजकार्यात कार्यरत असून, त्यांच्या कामाचा ठसा प्रत्येक समाजघटकात उमटला आहे.
संगीताताई वाघमारे यांनी महिलांच्या प्रश्नांपासून ते सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीपर्यंत अनेक ठिकाणी प्रभावीपणे आवाज उठविला आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत त्यांनी अनेक गरजू नागरिकांना घरकुल मंजूर करून दिले. तसेच ‘घरोघरी शौचालय’ या योजनेअंतर्गत शहर स्वच्छतेसाठी उल्लेखनीय कार्य केले. महिलांच्या बचतगटांना बळ देऊन आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने त्यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली.पेठ बीड भागातील विद्युत खांबावरील पथदिवे सुरू केले, मागील वर्षी दुष्काळ असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय टँकरद्वारे उपलब्ध करून दिली.तसेच या भागातील समस्या दूर करण्यासाठी सदैव तत्पर म्हणून संगीताताई ची ओळख आहे.
नगरपालिकेतील विविध विषयांवर त्यांनी नागरिकांना प्रशासनाशी जोडणारा दुवा म्हणून काम केले. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या मुलभूत सुविधांच्या उभारणीत त्या नेहमी पुढे असतात. शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, बुट आदींचे वाटप करून त्यांनी शिक्षणाला चालना दिली.
संगीताताई वाघमारे यांनी केवळ महिला वर्गातच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांमध्येही विश्वास निर्माण केला आहे. त्यांच्या ग्राउंड लेव्हलवरील उपस्थितीमुळे नागरिक त्यांच्या कार्यावर समाधानी आहेत. समाजातील दुर्बल घटक, वृद्ध, अनाथ, तसेच अपंग व्यक्तींसाठी त्यांनी विविध मदतकार्ये केली आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी संगीताताई वाघमारे या सर्व अंगांनी पात्र उमेदवार आहेत. त्यांचा अनुभव, सामाजिक बांधिलकी, लोकांशी असलेला जवळचा संपर्क आणि कार्यतत्परता पाहता नागरिकांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठी अपेक्षा आहे.
नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास बीड शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी संगीताताई वाघमारे आपले संपूर्ण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बीडच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची दृष्टी, प्रामाणिकता आणि जनसंपर्क हेच त्यांचे मोठे बळ ठरणार आहे. बीड शहरातील सर्वसामान्य मतदाराची पहिली पसंती म्हणून संजय तई वाघमारे याच आहेत.





