पवनचक्कीसाठी पोलिसाची शेतकऱ्याला दाबदडप !
तरुण शेतकऱ्याला"कॅरेक्टर खराब" करण्याची धमकी,व्हीडीओ व्हायरल.

बीड (प्रतिनिधी)बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यावाल्यांसाठी पोलीस प्रशासनाने अक्षरशः पायघड्या घातल्याचे दिसून येत आहे.शेतकऱ्यांना आपल्या शेतात पवनचक्कीसाठी जागा दिली परंतु त्याचा त्याचा मोबदला मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
पवनचक्की वाल्यापुढे पोलीस शेतकऱ्यांचं म्हणनं सुद्धा ऐकू येईनासे झाले आहे.
बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील कानडीघाट येथे पवनचक्कीसाठी पोलीस शेतकऱ्याला दाबदडप करत असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सात बारा दाखव असं म्हणत पोलीस कर्मचारी तुझं कॅरेक्टर खराब करून टाकेल अशी धमकीच देत असल्याचे व्हीडीओ मध्ये दिसत आहे. या प्रकारामुळे झाले असून अतिशय गंभीर आहे.
बीड तालुक्यातील चौसाळ्या पासून जवळच शेतकरी भयभीत ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे.पोलीस अशा प्रकारे दाबदडप करून थेट शेतकऱ्यांचेच कॅरेक्टर खराब करण्याची धमकी देत असतील तर ही बाब गंभीर आहे.
कानडीघाट येथील गणेश झोडगे नामक शेतकऱ्याच्या गट नंबर ४४९ मधील शेतातून १०० फुट अॅटो पॉवर या कंपनीची २२० के. व्ही. व्होल्टेज असलेली तार शेतीतून गेलेली आहे. त्याचा मोबदला शेतकऱ्यास मिळालेला नाही. मोबदल्याची मागणी केली असता – पोलीस शेतकऱ्याला धमक्या देत आहेत. झोडगे यांच्या शेतात प्रत्यक्ष गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तुझा सातबारा दाखव असे म्हणत तुझं कॅरेक्टर खराब करून टाकील अशी धमकी दिल्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामध्ये दोन पोलीस कर्मचारी शेतकऱ्याला दाबदडप करुन त्याला बाजुला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. गणेश झोडगे यांच्यासह भास्कर झोडगे व तेथील अनेक शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. मोबदल्याची मागणी केल्यास पोलीस अशा पद्धतीने दमदाटी करत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे. आम्ही पुण्यामध्ये एमपीएससी, युपीएससीचा अभ्यास करत आहोत आणि पोलीस कर्मचारी आमचं”करियर खराब करणार”अशी धमकी सगळ्यांसमोर देत असल्याचे गणेश झोडगे, कुडके यांनी म्हटले आहे.बीड जिल्ह्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला असून त्यातच पोलिस दाबदडप करून कॅरेक्टर खराब करण्याची धमकी देत असल्याने शेतकऱ्याला संताप व्यक्त होत आहे.





