पेठ बीड पोलीसांचे दारू,मटका व जुगार अड्ड्यांवर छापे.
हजारोचा मुद्देमाल व दारू जप्त,पो.नि.अशोक मोदीराज ॲक्शन मोडवर.

बीड (प्रतिनिधी) पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यात वाढ झाली असल्याने तरुण व्यसनाधीन होत आहे.
पेठ बीड पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध धंद्यांवर मोठी कारवाई करत दारू व मटका जुगाराच्या अड्ड्यांवर धाड टाकून मुद्देमाल जप्त केला आहे.
गावठी दारू प्रकरणात एकाच आरोपीवर दोनदा कारवाई करण्यात आली.
25 सप्टेंबर रोजी ईमामपुरा रोड, बार्शी नाका, बीड येथे दस्तगीर शामीरहुसेन शेख (रा. मोहम्मदिया कॉलनी, पेठ बीड) हा पत्र्याच्या शेडमध्ये गावठी सिंधी दारूची चोरटी विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याठिकाणी छापा टाकून पोलिसांनी 110 लिटर सिंधी दारू, किंमत अंदाजे 5,500 रुपये असा मुद्देमाल जप्त केला. याबाबत गुरनं. 263/2025, कलम 65(ई) म.प्रो.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच आरोपीवर यापूर्वी 130 लिटर सिंधी दारूसह (किंमत 6,500 रुपये) गुरनं. 255/2025 कलम 65(ई) म.प्रो.का. अंतर्गत कारवाई झाली होती.
मटका जुगार अड्ड्यांवरही धाड :
24 सप्टेंबर रोजी कडबा मंडी बाजारतळ, पेठ बीड येथे अजहर अक्रम शेख (वय 35, रा.भालदारपुरा, पेठ बीड) हा कल्याण नावाचा मटका जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. छाप्यात 1,400 रुपये रोख आणि साहित्य जप्त झाले असून गुरनं. 262/2025, कलम 12(अ) म.जु.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच रविवार पेठेत चिंचेच्या झाडाखाली अकबर मोहम्मद हुसेन शेख (रा. गांधीनगर, पेठ बीड) हा मटका जुगार खेळवित असल्याचे पोलिसांना समजले. छाप्यात त्याच्याकडून 570 रुपये रोख आणि साहित्य जप्त झाले. याप्रकरणी गुरनं. 259/2025, कलम 12(अ) म.जु.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तसेच कडबा मंडी बाजारतळ येथे दीपक बबन ढोणे (वय 28, रा. ढोरवाडा, पेठ बीड) याच्यावरही कारवाई झाली. पोलिसांनी त्याच्याकडून 700 रुपये रोख आणि साहित्य जप्त केले. याबाबत गुरनं. 261/2025, कलम 12(अ) म.जु.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईत पोह/1613 भोले, पोह/1257 ठोंबरे, पोह/1803 नितीन राठोड, पोह/548 गणेश चौघुले, पो.अं.1987 गिरी, पो.अं.1960 अलताफ, पो.अं.1551 परजणे व चालक पो.अं.1769 मदने यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सुरू आहे.





