ग्रामसेवक लाच घेताना एसीबीच्या ताब्यात.
मंजूर घरकुल कागदपत्रासाठी मागितली ग्रामसेवकांने लाच.

बीड (दि.19 सप्टेंबर) : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीडच्या पथकाने ग्रामपंचायत अधिकाऱ्यास लाच मागणीप्रकरणी रंगेहात पकडले आहे. ग्रामपंचायत कार्यालय, केकण सारणी, ता.कज, जि.बीड येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी सुरेश ठोंबरे (वय 44 वर्ष, रा. सारणी, ता.कज, जि.बीड) यांनी ग्रामस्थांकडून अनुदानासंबंधी कागदपत्रे करण्यासाठी लाच म्हणून पाच हजार रुपयांची मागणी केली होती.
तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. 18 सप्टेंबर रोजी ठोंबरे यांनी प्रत्यक्षात 5,000 रुपयांची लाच मागितली. मात्र अखेरीस तडजोड म्हणून त्यांनी 4,000 रुपये रोख आणि पहिल्या टप्प्यात 2,000 रुपये घेण्याचे मान्य केले.
यानंतर 19 सप्टेंबर रोजी ठरल्याप्रमाणे ठोंबरे यांनी तक्रारदाराकडून 2,000 रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई पोलिस निरीक्षक आनंदराव कडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास सदरची कारवाई श्रीमती माधुरी केदार कांगणे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, शशिकांत शिंगारे, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि छत्रपती संभाजी नगर, पोलीस उप अधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान कवडे, राहुलकुमार भोळ, सपोउपनि सुरेश सांगळे, पोलीस अंमलदार मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अनिल शेळके, गणेश म्हेत्रे, संतोष राठोड, अविनाश गवळी, प्रदिप सुरवसे, राजकुमार आघाव, सचिन काळे, अंबादास पुरी, गणेश मेत्रे सर्व ला.प्र.वि.बीड युनिट यांनी कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्ट्राचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




