ब्रेकिंग न्यूज

24 तासात मोटारसायकल चोर जेरबंद.

गेवराई पोलिसांची तत्पर कारवाई;दुचाकीसह एक ताब्यात.

बीड (प्रतिनिधी) : गेवराई पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यात अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला अटक करत चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक नवनित काँवत यांनी सर्व प्रकारच्या चोरींवर प्रभावी आळा घालण्याचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील जुना बसस्टॅन्ड परिसरातील हॉटेल साई प्रसाद समोरून एक मोटारसायकल चोरीला गेली होती. याप्रकरणी मोटारसायकल मालकाने 14 मे रोजी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

सदर गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. पोलिसांनी परसराम आबासाहेब बाराखडे (रा. गोविंदवाडी) याला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीस गेलेली हीरो पॅशन मोटारसायकल (क्र. एमएच 21 एएम 2089) जप्त केली.आरोपीस पुढील कारवाईसाठी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनित काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या आदेशानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर पवार, पो.ह. दिलीप सरवदे, अमोल सोनवणे, ऋषिकेश पोटे, आरेफ बागवान आणि विनोद कुटे यांच्या पथकाने केली.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button