ब्रेकिंग न्यूज

शिवसेना जिल्हाअद्यक्ष(VJNT)यांच्या वाहनावर दगडफेक.

अज्ञाताने गाडीच्या काचा फोडल्या,तक्रार दाखल. 

 

बीड (प्रतिनिधी) सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर छत्रपती संभाजी महाराज चौक, बायपास रोड परिसरात कारवर अज्ञात तिघांनी मोटर सायकलवर येऊन दगडफेक केल्याची घटना घडली आहे.या घटनेत कारच्या काचा फुटून नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

 शिवसेना जिल्हाध्यक्ष (VJNT)संजय गिरजाप्पा लकडे (वय 47, रा. बार्शी नाका, बीड) यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, दि. 10 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ते पारगाव येथून बीडकडे आपल्या टोयोटा कंपनीच्या (क्र. MH43AN5718) कारने येत होते. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज चौक येथे मागून आलेल्या मोटारसायकलवर बसलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. या दगडफेकीत गाडीच्या मागील व बाजूच्या काचा फुटून नुकसान झाले. त्यानंतर संबंधित इसम घटनास्थळावरून भरधाव वेगाने पसार झाले.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. शिवसेना जिल्हाध्यक्ष च्या वाहनावर हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून शिवसैनिक देखील हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button