ब्रेकिंग न्यूज

क्रिकेट खेळत असताना मैदानावर विजेची तार पडली.

मोठा अनर्थ टळला;तार तुटून मैदानावर पडताच तारेला लागली आग.

बीड (प्रतिनिधी)दिनांक 11 एप्रिल शनिवार रोजी बीड शहरातील बार्शी रोड परिसरात असलेल्या लॉ कॉलेच्या मागील बाजूस  क्रिकेट मैदानावर खेळ सुरू असतानाच अचानक विजेची तार तुटून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. पडलेल्या तारेमुळे काही क्षणांतच ठिणग्या उडत पेट लागल्याने मैदानावर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उपस्थित खेळाडू आणि नागरिकांनी तत्काळ सावधगिरी बाळगत बाजूला सरकल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शी रोडवरील लोकरीच्या मागील बाजूस असलेल्या मैदानावर दररोज सायंकाळी नागरिक वॉकिंगसाठी तसेच तरुण क्रिकेट खेळण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. घटनेच्या वेळी काही तरुण क्रिकेट खेळत असताना अचानक विजेची तार मैदानावर कोसळली. तारेतून ठिणग्या उडून आग लागल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांनी या घटनेची दखल घेत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः, अशा वर्दळीच्या ठिकाणी विजेच्या तारा सुरक्षित ठेवाव्यात, नियमित तपासणी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button