ब्रेकिंग न्यूज

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य शिबीर संपन्न.

बीड शहर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम.

बीड (प्रतिनिधी)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आणि जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत बीड शहर पोलीस ठाण्याच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजसेवेचा वसा जपणाऱ्या आंबेडकरांच्या विचारांना अनुसरून हा उपक्रम राबविण्यात आला.

पोलीस दल व सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे या उद्देशाने आयोजित या शिबिरात नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून मार्गदर्शन केले. हृदयविकार, मधुमेह, न्यूरोविकार तसेच अस्थिरोग यांसारख्या आजारांवर सल्ला व उपचार देण्यात आले. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडलेल्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

डॉ. सुनील बोबडे यांनी दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. प्रमोद शिंदे यांनी मोबाईलच्या अति वापरामुळे मानेच्या आजारांत वाढ होत असल्याचे सांगत योग्य पोश्चर ठेवण्याचा सल्ला दिला. तर डॉ. विशाल पिंगळकर यांनी मान व पाठीच्या विकारांकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन पांडकर यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे पोलीस व नागरिक यांच्यातील संवाद वाढून परस्पर विश्वास दृढ होतो.

या शिबिराचा एकूण ७२ नागरिकांनी लाभ घेतला असून, तपासणीसोबतच मोफत औषधांचे वाटपही करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक महेश जाधव, भागवत सानप, राजेंद्र मुंडे व शहंशा सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.

बीड शहर पोलिसांच्या या उपक्रमातून “निरोगी बीड, सुरक्षित बीड” हा संदेश प्रभावीपणे दिला गेला आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button