ब्रेकिंग न्यूज

वाढदिवसाला बोलवले नाही म्हणून तरुणाची आत्महत्या.

माझं दुःख कोणाला सांगू मी एकटा पडलो" असे स्टेटस मोबाईलवर ठेवून तरुणाची आत्महत्या.

बीड( प्रतिनिधी)अबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे किरकोळ कारणातून निर्माण झालेल्या मानसिक तणावामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मित्रांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला निमंत्रण न दिल्यामुळे मनाला लागलेल्या वेदनेतून २४ वर्षीय महेश उद्धव भणगे याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास महेश घराच्या छतावर गंभीर अवस्थेत आढळून आला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

काही दिवसांपूर्वी महेशचा मित्रांसोबत वाद झाला होता. त्यानंतर झालेल्या एका वाढदिवस समारंभाला त्याला बोलावण्यात आले नव्हते. या घटनेचा त्याच्या मनावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेपूर्वी त्याने मोबाईलवर एकटेपणाची भावना व्यक्त करणारा संदेश ठेवला होता.

महेशच्या वडिलांनी शेती विकून त्याच्यासाठी कपड्याचे दुकान सुरू करून दिले होते. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button